मुंबई : ‘विंग्स -बर्ड्स ऑफ इंडिया’ पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे १६ फेब्रुवारी रोजी मुंबई आणि नवी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. पक्षी संवर्धन आणि पर्यावरण जागरूकता वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून सर्वात मोठ्या पक्षी निरीक्षण कार्यक्रमांपैकी एक ‘विंग्स -बर्ड्स ऑफ इंडिया’ समजला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी २००५ पासून हा कार्यक्रम ‘बर्ड रेस ऑफ इंडिया’ या नावाने कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. भारतातील १४ शहरांमध्ये हे पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात येते. यामध्ये दरवर्षी ५० हून अधिक पक्षी निरीक्षक संघ सहभागी होतात. प्रत्येक संघातील व्यक्ती या कार्यक्रमात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी करू शकतात. या नोंदी नंतर विंग्स -बर्ड्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात येतात. याशिवाय, दुर्मिळ पक्ष्यांची नोंदही करण्यात येतात.

दरम्यान, या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षी अभ्यासकांसाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यावर्षी अधिक संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. असे पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संजॉय मोंगा यांनी सांगितले. तसेच यंदा पक्षी संवर्धनावरील विशेष व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती विंग्स -बर्ड्स ऑफ इंडिया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai and navi mumbai mumbai wings birds of india bird watching program is organized on february 16 print news sud 02