अन्नधान्य सुरक्षेबरोबरच आपण ऊर्जासुरक्षेचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवून आयात कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचे (एनटीपीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुप रॉय-चौधरी यांनी व्यक्त केली. तसेच सोलापुरात २०१७ मध्ये ‘एनटीपीसी’चा वीजप्रकल्प सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले. देशात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी ज्या वेगाने झाली त्याप्रमाणात कोळसा खाणी सुरू झाल्या नाहीत त्यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे कोळशाचे साठे आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीसाठी कोळसा उपलब्ध होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न लवकरात लवकर झाले पाहिजेत, असे चौधरी यांनी नमूद केले. अपुऱ्या कोळशामुळे मागच्या वर्षी ‘एनटीपीसी’ने सुमारे ९ दशलक्ष टन कोळसा आयात केला होता. यंदा कोळसा टंचाई वाढल्याने हेच प्रमाण १२ दशलक्ष टनपर्यंत वाढवावे लागले.
संक्षिप्त :‘कोळशाबाबत परावलंबित्व नको’
अन्नधान्य सुरक्षेबरोबरच आपण ऊर्जासुरक्षेचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवून आयात कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-10-2014 at 02:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai and thane news in short