मुंबई : कुर्ला परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. फजलू रेहमान (५२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर गेल्या सोमवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या बसने अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले, तर सात जणांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी शीव रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी एकाचा सोमवार, १६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. बेस्ट बसच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे.

हेही वाचा…लाल कांद्याच्या दरात मोठी घसरण जाणून घ्या, नाशिकमध्ये चार दिवसांत कांद्याच्या दरात किती घसरण झाली

ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा व अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. नंतर ही बस एका भिंतीवर आदळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना परिसरातील नागरिकांनी कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा व शीव रुग्णालयात दाखल केले होते.

Story img Loader