केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने २ ऑक्टोबरपासून सुरु केलेल्या धाडींचं सत्र सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. आज मुंबईमधील डोंगरी भागामध्ये टाकलेल्या एका छाप्यामध्ये एनसीबीने दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सात किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलेत.

नक्की वाचा >> “क्रूझवरील छोटे मासे पकडण्यात व्यस्त असणारी NCB अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो हेरॉईनसंदर्भात मात्र…”

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमंतलीपदार्थ विरोधी पथकाच्या मुंबईमधील तुकडीने सात किलो हेरॉईननसहीत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईमधील डोंगरी भागामध्ये ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेण्यात आलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये १५ कोटी रुपये इतकी आहे.

कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा मुंबईमध्ये एनसीबीचं धाडसत्र सुरु झालं. यामध्ये आधी पवईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. अंकित कुमार असं पवईमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्याकडेही अंमलीपदार्थ आढळून आले आहेत. मंगळवार रात्रीपासून एनसीबीकडून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव परिसरात ठिकठिकाणी छापे घालण्यात येत आहेत.

नक्की वाचा >> ड्रग्ज सापडलेल्या कोर्डेलिया क्रूझकडून आता ‘नवरात्री विशेष टूर’साठी आमंत्रण; नऊ दिवस शाकाहारी जेवण आणि…

एनसीबीने यापूर्वी रविवारी रात्रीपासून सोमवारी (४ ऑक्टोबर) पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. यामार्फत कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अंमली पदार्थ पुरवले जातात या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागली असून त्यानुसार सध्या छापेमारी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

२ ऑक्टोबरच्या रात्री एनसीबीने आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर केलेल्या कारवाईपासून धाड सत्राला सुरुवात झालीय. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले होते.