नाताळ सणाच्या उत्साहामुळे अवघी मुंबापुरी गुरुवारी झगमगून गेली होती. शहरातील विविध चर्चना मनमोहक रोषणाई करण्यात आली होती तर ठिकठिकाणी ख्रिसमस ट्रीही सजविण्यात आले होते. मरीन ड्राईव्ह परिसरालाही ख्रीसमसचा रंग आला होता. चर्चसोबत सुट्टीनिमित्ताने बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील मॉल्समध्येही नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील रस्त्यांवरून फिरणारा सांताक्लॉज लहानथोरांचे लक्ष वेधून घेत होता. अनेक ठिकाणी नाताळनिमित्त येथू ख्रिस्ताच्या अवताराची माहिती सांगणारे मनमोहक देखावेही केले होते.

Story img Loader