Atal Setu MTHL Rules By Mumbai Police: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ अटल सेतू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. लोकार्पणानंतर सागरी सेतूवरील वाहनांच्या वाहतुकीसाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

अटल सेतूवर वाहनांच्या वेगाची मर्यादा किती असणार?

बुधवारी पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार, संभाव्य धोके, अडथळे आणि गैरसोय कमी करण्यासाठी, मुंबई पोलिसांनी भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर वेग मर्यादा लागू केल्या आहेत. MTHL वर कार, टॅक्सी, हलकी मोटार वाहने, मिनीबस आणि टू-एक्सल बससह चारचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा १०० किमी प्रतितास असेल. सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी पूल चढताना आणि उतरताना वेगासाठी ४० किमी प्रतितास असा निर्बंध असणार आहे.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
RTO officials fined over 40 Dombivli rickshaw drivers between 5,000 to 20,000 rupees.
डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई

MTHL वर ‘या’ वाहनांना नो एंट्री!

याव्यतिरिक्त, मोटारसायकल, मोपेड, तीनचाकी वाहने, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा घोडागाडी सारख्या कमी वेगवान वाहनांना MTHL वर प्रवेश करण्यास मनाई आहे. तसेच, अवजड वाहने, ट्रक आणि मुंबईच्या दिशेने जाणार्‍या बसेसना ईस्टर्न फ्रीवे वापरण्यास मनाई आहे. त्याऐवजी, त्यांना मुंबई पोर्ट-शिवडी एक्झिट (एक्झिट 1C) साठी आणि पुढील प्रवासासाठी ‘गडी अड्डा’ जवळील MBPT रोडचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे ४०० कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत.

हे ही वाचा<< मुंबई: १८ हजार कोटींच्या ‘अटल सेतू’ची पहिली झलक; मोदींनी दाखवला भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचा Video

MTHL एक 6-लेन सी लिंक आहे, ज्यामध्ये समुद्रावरील १६.५० किमी भाग आणि जमिनीवरील ५.५ किमी रस्ता समाविष्ट आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या २ तासांवरून कमी होणार असल्याचे समजतेय. २०१८ पासून या १८००० कोटी रुपयांच्या सेतूच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. नियोजनानुसार हे काम ४.५ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कोविड-19 महामारीमुळे पाहा प्रकल्प आठ महिन्यांनी लांबणीवर पडला होता.

Story img Loader