मुंबई : बांगलादेशातील राजकीय अस्थिरता व तेथील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही पेटले आहे. या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याची शक्यता असल्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बांगलादेशी घुसखोरांची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत भारतातील कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्या साखळीविरोधात कारवाई तीव्र केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एटीएसने अशा घुसखोरांची बँक खाती गोठवणे, शिधापत्रिका रद्द करणे, भारतातील नागरी कल्याण योजनांचा लाभ बंद करणे, परिवहन विभागाद्वारे चालक परवाना रद्द करणे, मोबाइल सिमकार्ड बंद करणे अशा विविध कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची लाटसदृश्य स्थिती ? जाणून घ्या, थंडी का वाढली?

देशात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईने उच्चांक गाठला होता. त्या अंतर्गत गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून ३६८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये मुंबईतून १४७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. दरवर्षी मुंबईतील बांगलादेशींविरोधातील कारवाईत वाढ होत आहे. यादरम्यान बहुसंख्य बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय आधारकार्ड व पारपत्र बनवल्याचे आढळून आले आहे. याशिवाय अनेक बांगलादेशी भारतात स्थिर झाल्यानंतर त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदा काम करतात. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांच्या भारतातील वास्तव्यावर मर्यादा आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या बँक खात्यातून बेकायदा व्यवहारही झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा – महाअंतिम फेरीत पंकज त्रिपाठी प्रमुख पाहुणे; राज्यातील सर्वोत्तम ‘लोकसत्ता लोकांकिका’ २१ डिसेंबरला ठरणार

घुसखोरांना परत पाठवण्यात मर्यादित यश

गेल्या तीन वर्षांत मुंबई पोलिसांनी सुमारे ६९६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली, परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे केवळ २२२ बांगलादेशी घुसखोरांना मायदेशी पाठवता आले. यावर्षी (सप्टेंबर २०२४ पर्यंत) मुंबईत १८१ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून १३३ जणांना परत पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी अटक केलेल्या ३६८ बांगलादेशी नागरिकांपैकी ६८ जणांना मायदेशी परत पाठवता आले, तसेच २०२२ मध्येही अटक केलेल्या १४७ बांगलादेशी घुसखोरांपैकी केवळ २१ जणांना परत पाठवण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bangladesh infiltrators financial dilemma attempt 696 bangladeshi nationals arrested in three years mumbai print news ssb