मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती (मुंबै) सहकारी बँकेतील गेल्या पाच वर्षांतील अनियमिततेची चौकशी करण्याच्या सहकार विभागाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे आदेश निघूनही चौकशीस सुरुवात न करणाऱ्या  सहकार खात्यातील अधिकाऱ्यांचा चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.  

बँकेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेत सहकार विभागाने जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार ही चौकशी होणार होती. तीन महिन्यांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दिले होते. या आदेशाला बँकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही याचिका न्या. गिरीश कुलकर्णी यांनी फेटाळली. बँकेतर्फे विनित नाईक आणि सरकारतर्फे एस यू कामदार या ज्येष्ठ वकिलांनी बाजू मांडली.

Court relief to Anil Ambani case in Canara Bank fraud case
अनिल अंबानींना न्यायालयाचा दिलासा; कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती, कारवाईबाबत आरबीआयला विचारणा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Xerox shops will be locked during board exams to make exams copy-free
मंडळाच्या परीक्षेवेळी झेरॉक्स दुकानास ठोकणार कुलूप, आता शासकीय स्टाफ पण दिमतीस
bombay hc ordered to form special investigation team to investigate financial fraud
७,३०० कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण; एसआयटी चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
Reserve Bank application for Aviom bankruptcy proceedings
‘एव्हिओम’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी रिझर्व्ह बँकेचा अर्ज
SEBI
सेबीकडून चार Stock Brokers ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द, जाणून घ्या तुमच्याही ब्रोकरचा आहे का समावेश?
indian banks facing various challenges amid high interest rate
भारतीय बँकांना नफ्याला कोरड; जगातिक संस्थेचा इशारा नेमका काय?

मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चाचणी लेखापरीक्षण आणि बँकेतील प्रशासकीय अनियमिततेबाबतच्या अहवालात बँकेच्या कारभाराबाबत गंभीर ठपका ठेवण्यात आला असून त्यानुसार बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला होता. त्यानुसार चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता महत्त्वाची असते आणि त्याचा ग्राहकांवर नकळत परिणाम होत असते. अशी चौकशी केली गेली आणि त्यातून त्रुटी आढळून आल्या तरी बँकेला कलम ८७ अन्वये आपली बाजू मांडण्याची संधी आहे. जेव्हा आर्थिक अनियमिततेचा वा लेखा परिक्षण अहवालात बँकेच्या त्रुटींकडे लक्ष वेधले जाते तेव्हा पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी होण्याची आवश्यकता असते, असे मत न्या. कुलकर्णी यांनी ही याचिका फेटाळताना नोंदवले आहे.

Story img Loader