मुंबई : महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुंबईच्या काही भागात पर्यटनाला येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाच्यावतीने काही अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील. कान्हेरी गुंफा येथील पुरातन लेण्यांना भेट देणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्ग क्रमांक १८८ या बसमार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते कान्हेरी गुंफा दरम्यान सकाळी १०.३० वाजेपासून ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत एकूण ६ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.

बोरिवली रेल्वे स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा दरम्यान नियमित बस सेवा देखील कार्यरत राहील. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार, एलोरा चौकी (बोरिवली स्थानक पूर्व) तसेच कान्हेरी गुंफा येथे बसनिरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त बाबुलनाथ येथील शिवमंदिरास भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत यादरम्यान बसमार्ग क्रमांक ५७, ६७ आणि १०३ या बस मार्गावर एकूण ८ जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहे. नागरिकांनी या अतिरिक्त बस सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्यावतीने करण्यात आले आहे.

Story img Loader