मुंबई : रमजान ईद सोमवारी साजरी करण्यात येणार असून मंगळवारी बासी ईद साजरी केली जाते. दरवर्षी बासी ईदच्या दिवशी मुंबई शहरात, विशेषतः मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, ॲन्टॉप हिल या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्टच्या जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. यावर्षी बासी ईदच्या दिवशी १२८ जादा बस चालवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.