मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे मागील काही वर्षांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असून त्यामुळे नागरिकांचे मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रक्तशुद्धीकरणाची गरज भासणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील जी.टी. रुग्णालय व कामा रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईसह आसपासच्या परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्र मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र येथील रुग्णांची संख्या लक्षात घेता अन्य रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. परिणामी सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे साधारणपणे दीड वर्षांपूर्वी सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये १२ खाटांचे रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या रक्तशुद्धीकरण केंद्रातही रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने राज्यातील जी.टी. रुग्णालय व कामा रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही रुग्णालयांसाठी प्रत्येकी एक रक्तशुद्धीकरण यंत्र खरेदी करण्यात येणार आहे.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम

हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेतील लिपिक पदाच्या १८०० जागांसाठी दोन लाख अर्ज

रक्तशुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी एका रुग्णाला किमान तीन तास लागतात. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांमध्ये दिवसाला प्रत्येकी चार ते पाच रुग्णांचे रक्तशुद्धीकरण करणे शक्य होणार आहे. कामा रुग्णालय हे महिलांसाठी विशेष रुग्णालय आहे. महिलांमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. कामा रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्रामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळू शकेल. या रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये माफक दरात रक्तशुद्धीकरण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये बोनस, आचार संहिता लागू होण्यापूर्वी तातडीने घोषणा

सहा रक्तशुद्धीकरण यंत्रे खरेदी करणार

जी.टी रुग्णालय व कामा रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या रक्तशुद्धीकरण केंद्रांसाठी रक्तशुद्धीकरण यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जे.जे. रुग्णालय व सेंट जॉर्जेस रुग्णालयासाठीही प्रत्येकी एक रक्तशुद्धीकरण यंत्र खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीही रक्तशुद्धीकरण यंत्र खरेदी करण्यात येणार आहेत. सहा रक्तशुद्धीकरण यंत्रे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने ५ कोटी ४० लाख रुपये मंजूर केले आहेत.