Latest News in Mumbai Today Live : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागात देशविदेशातील पर्यटकांवर मंगळवारी हल्ला झाला. या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे अधिकारी अतुल मोने यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे विभागात शोककळा पसरली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कारखान्यात वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) पदावर अतुल मोने कार्यरत होते. राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय आपल्याशी चर्चा न करता परस्पर घेण्यात आल्याबद्दल संतप्त झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today, 23 April 2025
पावसामुळे पहलगाम दौरा रद्द झाला नि वाचलो… सहकुटुंब काश्मीरला गेलेल्या मुंबईकर पर्यटकाने मानले देवाचे आभार!
काश्मीरचे पर्यटन थांबणार नाही…,सरकारकडून अधिकृत सूचना मिळेपर्यंत काश्मीरच्या टूर्स सुरूच ठेवण्याचा पर्यटन व्यावसायिकांचा निर्धार
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कटऱ्यात संप… वैष्णोदेवी दर्शनाला गेलेल्या मुंबईकर भाविकांचे हाल!
कटऱ्यामध्ये भाविकांचा ओघ वाढलेला असतानाच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे कटऱ्यामधील दुकाने, वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात तेथे गेलेल्या महाराष्ट्र व मुंबईतील पर्यटकांचे हाल होऊ लागले आहेत.
कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकात वंदे भारत, तेजस एक्स्प्रेसला ब्रेक ? १५ जूननंतरचे तिकीट आरक्षण मिळेना
हसतमुख नि मनमिळावू… पहलगाम हल्ल्यातील मृत नौदल अधिकाऱ्याचे परिचितांनी केले स्मरण!
जैन मंदिराच्या पाडकामावरून राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे पालिकेवर ताशेरे
पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय परस्पर; मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय आपल्याशी चर्चा न करता परस्पर घेण्यात आल्याबद्दल संतप्त झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना फैलावर घेत असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, अशी तंबीही दिली.
‘वाढवण-इगतपुरी’ कामास लवकरच प्रारंभ; ‘एमएसआरडीसी’कडून चारोटी-इगतपुरीदरम्यान आराखडा
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे.
काश्मीर हल्ल्यात मुंबईच्या रेल्वे अधिकाऱ्याचा मृत्यू
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन भागात देशविदेशातील पर्यटकांवर मंगळवारी हल्ला झाला. या हल्ल्यात मुंबईतील रेल्वे अधिकारी अतुल मोने यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रेल्वे विभागात शोककळा पसरली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कारखान्यात वरिष्ठ विभाग अभियंता (एसएसई) पदावर अतुल मोने कार्यरत होते. मोने हे डोंबिवली पश्चिमेला राहत होते.
सविस्तर वाचा…
Mumbai News LIVE Updates : मुंबईशी संबंधित बातम्या एका क्लिकवर… (संग्रहित छायाचित्र)