माहिम मधील छोटा दर्गा भागातील अल्ताफ नावाची चार मजली इमारत सोमवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये  एकाचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीखाली अनेकलोक अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या पाच  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू आहे. या इमारतीखाली पार्किंगमधील अनेक मोटारी दबल्या गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Story img Loader