Mumbai Bus Accident Best Hits Vehicles Pedestrian at Lalbaug : मुंबईच्या लालबाग परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री (१ सप्टेंबर) लालबागमध्ये एका बसने नऊ जणांना धडक दिली. त्यापैकी पाच जणांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर तिघांवर अद्याप उपचार चालू आहेत. मात्र या अपघातात जबर जखमी झालेल्या एका तरुणीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. या बस चालकावर कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बसमधील एका मद्यधुंद प्रवाशामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

बसमधील एका मद्यधुंद प्रवाशाचं चालकाबरोबर भांडण झालं, यातून त्या प्रवाशाने चालकाबरोबर हुज्जत घातली, हे भांडण हमरीतुमरीवर आलं. त्याचदरम्यान, त्या प्रवाशाने बसच्या स्टीअरिंगचा ताबा मिळवण्याचा, चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. मद्यपीने स्टीअरिंग वळवलं आणि बसने काही वाहनं व पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात नऊ जण जखमी झाले होते. ज्यांना जवळच्याच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापैकी एका तरुणीचा मृत्यू झाला आहे, तसेच जखमींपैकी पाच जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिघांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे.

rupali ganguly starr anupamaa serial camera assistant death after tragic accident on set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठा अपघात; विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू

हे ही वाचा >> Mumbai road rage : मुंबईत ओला टॅक्सी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार रिषभ चक्रवर्तीला अटक, व्हायरल व्हिडीओनंतर कारवाई

पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की “मद्यधुंद प्रवशाने बस चालकाशी वाद घातला आणि त्याने बसचं स्टीअरिंग वळवलं. ज्यामुळे हा अपघात झाला. बसने पादचारी, रस्त्यालगतच्या कार व दुचाकींना धडक दिली”. काळाचौकी पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की बस नंबर ६६ (दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथून सुटणारी इलेक्ट्रिक बस) सायनवरून राणी लक्ष्मीबाई चौक या बस थांब्याच्या दिशेने जात होती. तेव्हाच हा अपघात झाला.

हे ही वाचा >> मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेतील ५७६ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कासवगतीने, परिणामी पुनर्वसित इमारतींच्या खर्चात भरमसाठ वाढ

तीन पादचाऱ्यांची प्रकृती गंभीर

बस लालबागमधील गणेश टॉकीजजवळ पोहोचली तेव्हा मद्यपीने स्टीअरिंग पकडलं. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे बसने दोन दुचाकी, एक कार आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. यामध्ये नऊ जण जखमी झाले. यापैकी तिखांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, ज्याच्यामुळे हा अपघात झाला त्या मद्यपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.