मुंबई : तीन वर्षांपूर्वी झालेल्या ७० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी आझाद मैदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृत व्यक्तीच्या बहिणीने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाच्या आदेशावरून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी अमृतलाल क्रांतीलाल पटेल (७०) यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना १६ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. त्यावेळी शवविच्छेदन अहवालात पटेल यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तपास थांबवला होता. मात्र पटेल यांची बहीण ज्योत्स्नाबेन पटेल यांनी पोलिसांकडे क्रांतीलाल पटेल यांची हत्या झाल्याची तक्रार केली. पण मृत्यू नैसर्गिक असल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर ज्योत्स्नाबेन पटेल यांनी महादंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली.
हेही वाचा : संरक्षण आस्थापनांपासून ५०० मीटरपर्यंत बांधकामांवरील निर्बंध शिथिल? पालिकेकडून परवानगी देण्यास सुरुवात
न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात दाद मागितली. सत्र न्यायालयाने याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश आझाद मैदान पोलिसांना दिले. अखेर पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी पटेल यांची पत्नी हेमलता पटेल व नोकर दीपक झा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पटेल यांना नवसारीहून मुंबईला घेऊन येत असताना हे दोघे त्यांच्या सोबत होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.