मुंबई : कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे, तसेच काही ठिकाणी कांदळवनाची कत्तल करून गोदामे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करीत आहेत.

मुंबई महानगर क्षेत्र, रायगड जिल्ह्यातील प्रादेशिक वनविभागाच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्राचे सर्वेक्षण व पडताळणी करून एकूण १९५ संवेदनशील ठिकाणी एकूण ६६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मान्यता मिळाली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण येथील एकूण १९५ कांदळवनातील संवेदनशील ठिकाणी एकूण ६६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि पाच वर्ष देखभाल-दुरुस्तीसाठी ११९.८८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विनंतीनुसार हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दरम्यान, निविदा प्रसिद्ध केल्यानंतर काही संस्था पुढे आल्या आहेत. सध्या या संस्थांची पडताळणी सुरू असून संस्थेच्या नियुक्तीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रस्ताव अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) मुंबई यांनी १८ जुलै रोजी शासनाकडे मान्यतेसाठी सादर केला आहे.

horiba India Hydrogen vehicle
चाकणमध्ये हायड्रोजन वाहन इंजिन चाचणी सुविधा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला

हेही वाचा – अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट

ठाणे खाडीत मोठे कांदळवन क्षेत्र आहे. त्यावर राडारोड्याचा भराव टाकून भूमाफियांकडून कांदळवने नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भिवंडी येथील कशेळी भागात खाडीकिनारी असलेल्या कांदळवनावर राडारोडा टाकून अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. दुर्लक्षामुळे येथील कांदळवन क्षेत्राची हानी सुरूच आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कांदळवन क्षेत्राच्या परिसरावर सतत नजर ठेवता येईल. यामुळे कांदळवनात करण्यात येणारा भराव रोखला जाईल, तसेच भूमाफियांविरोधात कारवाई करणेही शक्य होईल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून येथील कांदळवन क्षेत्रावर वन विभागाचेही लक्ष राहणार आहे.

हेही वाचा – मुंबई : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, नवीन वर्षात लोकार्पण, ‘एमएमआरडीए’ची माहिती

सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे कांदळवनाच्या संरक्षणाला खीळ बसली आहे. लवकरच कांदळवनांच्या क्षेत्रांना केंद्रिकृत नियंत्रण कक्षासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भूमाफियांना पकडण्यासाठी जलद कृती दल तैनात करण्याचे सूचित करण्यात आले आहे. – बी.एन.कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन

Story img Loader