मुंबईत सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचे काम रखडले असल्याची कबुली देतनाच पुणे, नाशिकमध्ये मात्र ते लवकरात लवकर बसविले जातील, अशी ग्वाही विधान परिषदेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली. नाशिकमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव गेली दोन वर्षे पडून असल्याबाबत जयवंत जाधव यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना सीसीटीव्हीबाबत गृहमंत्र्यांनी माहिती दिली.
मुंबईतील सीसीटीव्हीसाठी आलेल्या सर्वात कमी रकमेच्या निविदाकाराने माघार घेतली. आता हा खर्च वाढला असून दुसऱ्या क्रमांकाची निविदा ९५० कोटी रुपयांची आहे. मुख्य सचिवांची समिती त्याबाबत प्रक्रिया करीत आहे.
पुण्यासाठी ३३८ कोटी रुपयांची निविदा आली असून नाशिकसाठी ५१ कोटी रुपयांची आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०१५ मध्ये असून तत्पूर्वी तेथे सीसीटीव्ही बसविले जातील, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader