मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ब्लॉक कालावधीत मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या रेल्वे स्थानकांवर लोकल थांबा नसेल. दरम्यान, हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले
मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असून या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या लोकल विद्याविहार स्थानकानंतर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

  • अप धीम्या लोकल विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉकदरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांवर लोकल उपलब्ध होणार नाहीत.
  • ब्लॉकपूर्वीची शेवटची डाऊन लोकल ही सकाळी १०.०७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून ठाण्यापर्यंत धावेल. ब्लॉकनंतर पहिली डाऊन लोकल दुपारी ३.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटून टिटवाळा येथे रवाना होईल.
  • ब्लॉकपूर्वीची शेवटची अप लोकल ही सकाळी ८.५२ वाजता बदलापूरवरून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रवाना होईल. ब्लॉकनंतर पहिली अप लोकल ही दुपारी २.४१ वाजता कल्याणवरून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रवाना होईल.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूर/वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असेल. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी/नेरळ स्थानकांवरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.