मुंबई : पश्चिम रेल्वेवर धावणारी मुंबई सेंट्रल – सुरत फ्लाईंग एक्स्प्रेसने कात टाकली असून ही एक्स्प्रेस नव्या रुपात दाखल झाली आहे. या एक्स्प्रेसचे जुने इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डबे काढून त्याऐवजी नवीन लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे ही एक्सप्रेस अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे.

भारतीय रेल्वेवर सर्वात प्रथम डिसेंबर २००३ मध्ये मुंबई – नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एलएचबी डबे जोडण्यात आले. त्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये हळूहळू एलएचबी डबे असलेल्या एक्स्प्रेसची संख्या वाढवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल – सुरत फ्लाईंग एक्स्प्रेसला नुकतेच एलएचबी डबे जोडण्यात आले आहेत. गाडी क्रमांक १२९२१ मुंबई सेंट्रल – सुरत फ्लाईंग एक्स्प्रेसला १६ जुलैपासून, तर सुरत फ्लाईंग एक्स्प्रेस ते मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस १७ जुलैपासून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. या एक्स्प्रेसना २१ डबे असणार आहेत. नवे डबे जोडल्यामुळे प्रवाशांची सुरक्षा वाढेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास