मुंबई आणि आसपासच्या परिसरात बुधवारी सायंकाळी पाऊस कोसळल्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदारवर्गाचे हाल झाले. गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडल्याची नोंद झाली आहे.दरम्यान, गुरुवारी देखील ढगाळ वातावरण राहणार असून गडगडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवात पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडासह कोसळेलेल्या पावसाने मुंबईला धुऊन काढले.

हेही वाचा >>> मुंबई: बारा तासांत खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

गेल्या चोवीस तासात शहर भागात ३०.९६ मिमी, पूर्व उपनगरात ३२.६४ मिमी, पश्चिम उपनगरात १९.२९ मिमी पावसाची नोंद झाली.गुरुवारी देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून सकाळी १०.३४ वाजता समुद्रात भरतीची वेळ आहे. यावेळी ४.२५ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर रात्री १०.३७ वाजता देखील समुद्रात भरतीची वेळ असून यावेळी ३.९१ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

Story img Loader