Mumbai Chembur Metro Accident Suman Nagar : मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचं बांधकाम चालू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचं अर्थवट बांधकाम कोसळल्याची माहिती समोर आली आहे. ३१ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. या मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचं काम चालू आहे. सळई व काँक्रीटच्या सहाय्याने हे खांब उभारले जात असून यापैकी एक अर्धवट खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर व मोकळ्या जागेत कोसळला. २० फूट उंचीच्या सळया रोवून खांब उभारणीचं काम चालू होतं. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातवरण पसरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे मेट्रोच्या कामावर, बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. हे बांधकाम थोडं आजूबाजूला पडलं असतं किंवा रस्त्याच्या उजव्या बाजूला पडलं असतं तर फार मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे मेट्रोचं काम ज्या भागातून जातंय तिथे रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

या दुर्घटनेमुळे शीव-ट्रॉम्बे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai chembur under construction metro pillar falls on residential society asc