मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी तत्काळ शिष्यवृत्तीसंबंधित अर्ज भरावेत, अन्यथा संपूर्ण शैक्षणिक शुल्क आकारले जाईल, असे ‘आयडॉल’ने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलाट तिकीट विक्री बंद

जवळपास अडीच हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरले नसल्याची माहिती ‘आयडॉल’ने दिली. ‘शिष्यवृत्तीसंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक ‘आयडॉल’कडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन, अर्ज भरण्यास मदत तसेच तांत्रिक समस्या सोडविण्याचे काम सदर अधिकाऱ्याद्वारे केले जाते, अशी माहिती ‘आयडॉल’चे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांनी दिली.