मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने पहिला ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल’ प्रकाशित केला. मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने अहवाल तयार केला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते बुधवारी या अहवालाचे मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रकाशन करण्यात आले. पालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील भांडवली खर्चाच्या ३२ टक्के तरतुदी या वातावरण कृती आराखड्यासाठी वापरण्यात येणार असून त्यादृष्टीने येत्या वर्षात वातावरणविषयक प्राधान्यक्रम तयार करण्यात आला आहे.

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यातील कृती आणि शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने पहिला वातावरणीय अर्थसंकल्प तयार केला आहे. असा अर्थसंकल्प तयार करणाऱ्या १३ जागतिक शहरांपैकी मुंबई हे एक शहर आहे. या अर्थसंकल्पाच्या प्रकाशनाच्या वेळी उपआयुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) मिनेश पिंपळे, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी अश्विनी जोशी म्हणाल्या की, पर्यावरणाप्रती जागरुक राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरी संस्था या नात्याने मुंबई महानगरपालिकाही या जबाबदारीप्रती अत्यंत संवेदनशील आणि जागरुक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यांचा पर्यावरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. या विभागांमार्फत हाती घेण्यात येणारे प्रकल्प किंवा राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे, हा या वातावरणीय अर्थसंकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.

Unrest in the Grand Alliance at the request of Devendra Fadnavis to absolve him from responsibility
जबाबदारीतून मुक्त करा! फडणवीस यांच्या विनंतीने महायुतीत अस्वस्थता
The Mahavikas Aghadi which won 30 seats in the state in the Lok Sabha elections took the lead in more than 150 assembly seats
विधानसभेच्या दीडशे जागांवर ‘मविआ’ला बळ; लोकसभेच्या निकालातील चित्र; महायुतीला १२५ मतदारसंघांत आघाडी
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Deputy Chief Minister Statements by Devendra Fadnavis discussion BJP
फडणवीस यांचा निर्णय नाराजीपोटी ?
Narendra modi reduced base shocking Foreign media tone on Lok Sabha results
मोदींचा घटलेला जनाधार ‘धक्कादायक’! लोकसभा निकालांविषयी परदेशी माध्यमांचा सूर
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Ajit Pawar group MLAs meeting today Mumbai
अजित पवार गटाच्या आमदारांची आज बैठक;आमदार शरद पवार गटात परतण्याच्या चर्चेने अस्वस्थता
shambhuraj desai
देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई? राजकीय चर्चांवर उत्तर देत म्हणाले…

हेही वाचा >>> स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी, आयएएस अधिकारी सौरभ राव व डॉ. श्रीकांत परोपकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाचे महत्त्व

* वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाच्या माध्यमातून मुंबईशी निगडित धोरण, कृती व अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये वातावरणीय वचनबद्धतांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. तसेच यामुळे वातावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी, मूल्यमापन, संनियंत्रण अधिक सक्षम करता येईल.

हा अर्थसंकल्प तयार करताना वातावरणाशी संबंधित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या २० विभागांसोबत सल्लामसलत करून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

• मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये ऊर्जा आणि इमारती, एकात्मिक गतिशीलता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरित आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता आणि शहरी पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भांडवली खर्चासाठी ३१,७७४.५९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी अंदाजे १०,२२४.२४ कोटी रुपये म्हणजेच ३२.१८ टक्के रकमेच्या तरतुदी या मुंबई वातावरण कृती आराखड्याशी निगडित आहेत. वातावरण अंदाजपत्रकातील सर्वात जास्त वाटा हा नागरी क्षेत्र पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रासाठी आहे. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प या खात्यांचा आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यातील स्वच्छता संबंधित उपक्रमांचा समावेश होतो.

वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२४-२५ हा मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या https://mcap.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.