मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ लसीकरण मोहिमेची पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ७ ते १२ ऑगस्टदरम्यान नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवली. या मोहिमेची दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> मुंबई : पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे काही लोकल अंशत: रद्द

पहिल्या फेरीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून ० ते ५ वयोगटातील २,६३८ मुलांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यापैकी २,८०६ बालकांचे व २९६ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले. पहिल्या फेरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना यश आले आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविका, तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता. दरम्यान, नियमित लसीकरणासाठी ७ ते १२ ऑगस्ट या कालावधीत १,४०६ सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ० ते ५ वयोगटातील ११ हजार ५३९ बालकांचे व १,२०० गरोदर मातांचे नियमित लसीकरण करण्यात आले.