‘निवडणुका जिंकण्यासाठी अथक परीश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे हे नेतेमंडळींचे काम असते, अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जनार्दान चांदूरकर यांनी सोमवारी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या शीतल म्हात्रे यांचा सत्कार आणि पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन विभागाचे उद्घाटन यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित राहणार होते. पण मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी न फिरकल्यानेच बहुधा चांदूरकर यांनी नेतेमंडळींवर तोफ डागली. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याचा किंवा त्यांना लक्ष्य करण्याचा आपला हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण चांदूरकर यांनी नंतर केले.

Story img Loader