मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत आणि नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्याच वर्षी राज्य दहशतवादविरोधी पथकातून (एटीएस) मुंबई पोलीस दलात समाविष्ट झालेले अधिकारी दयानंद उर्फ दया नायक यांचा समावेश आहे. नायक यांच्यासह २३ अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर म्हणजेच २०२१ मध्ये दया नायक यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. प्रशासकीय बदलीचे कारण त्यावेळी पुढे करण्यात आले होते. परंतु बदलीच्या आदेशाला दया नायक यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) आव्हान दिले होते. मॅटने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये रुजू झाले होते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>> मराठा आरक्षण : अखेरच्या दिवशी १ लाख ८० हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान, ७० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

सध्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या दया नायक यांच्यासह पंढरीनाथ पाटील आणि सुधीर दळवी यांना बढती देत गुन्हेशाखेत तर, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकाश बागल, जगदीश कुलकर्णी आणि दिपक दळवी यांना बढती देत आर्थिक गुन्हे शाखेतच नियुक्ती देण्यात आली आहे. नागपाडा पोलीस ठाण्यातील सचिन कदम यांना बढती देऊन आर्थिक गुन्हे शाखेत आणि आर्थिक गुन्हे शाखेतील अजय जोशी यांना बढती देऊन मुलुंड पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत गरांडे यांना ॲन्टाॅप हील पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली असून सशस्त्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांच्याकडे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय़, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली असून भायखळा पोलीस ठाण्यातील मंजुषा परब यांना बढती देऊन भायखळा पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कांदवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव यांची कफ परेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली असून कांदीवली पोलीस ठाण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे हे सांभाळणार आहेत. तर, कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मच्छिंद्र यांच्याकडे डी. एन. नगर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीचा विस्तार, वंचितसह ‘या’ पक्षांचाही समावेश; बैठक संपल्यानंतर राऊत म्हणाले….

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जीवन खरात यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात, सशस्त्र पोलीस दलातील वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे यांची वाहतूक विभाग, आर्थिक गुन्हेशाखेतील वरिष्ठ निरीक्षक नितीन पोतदार यांची अंमलबजावणी कक्षात तर, मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कांतिलाल कोथिंबीरे यांची पूर्व नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक मोहीनी लोखंडे यांची व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्यासह एकूण १२ पोलीस निरीक्षकांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील मेघवाडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विनायक मेर यांच्यावर गावदेवी विभागाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या मेघवाडी विभागाची जबाबदारी मिरा-भाईंदर-वसई-विरार येथून मुंबईत नियुक्ती झालेल्या सहायक पोलीस आयुक्त संपत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र पोलीस अकादमी येथून बदली होऊन आलेल्या सहायक पोलीस आयुक्त प्राची कर्णे यांची विशेष शाखा एकमध्ये आणि राज्य गुप्तवार्ता विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना पोलीस निरीक्षक पदी बढती देऊन त्यांची धारावी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. मलबारहील पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक चेतन राठोड यांच्यासह १६ पोलीस निरीक्षक, अोशिवरा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद नगराल यांच्यासह २७ सहायक पोलीस निरीक्षक आणि समतानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक तुषार इक्के यांच्यासह ११९ पोलीस उपनिरीक्षकांच्या विविध विभागांत बदल्या करण्यात आल्या आहेत.

Story img Loader