‘लालबागचा राजा’च्या मंडपात पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी एका महिला पोलिसाला मारहाण केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी महिला पोलिसाने तक्रार दिली असली तरी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी कार्यकर्त्यांनी उद्धट वर्तन आणि महिलांनाही धक्काबुक्की केल्याच्या चित्रफिती चित्रवाणी आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर फिरत आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुजोर कार्यकर्त्यांना लगाम घालण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही कार्यकर्त्यांची दादागिरी सुरूच आहे. सोमवारी संध्याकाळी बंदोबस्ताला असलेल्या कविता पाळेकर (२२) यांना एका महिला कार्यकर्तीने बेदम मारहाण केली. ताडदेव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पाळेकर सोमवारी बंदोबस्तासाठी आल्या होत्या. त्या व्हीआयपी गेट क्रमांक २ च्या बाहेर बंदोबस्तासाठी होत्या. त्या वेळी एक महिला कायकर्त्यां प्रियांका धुरी काही लोकांना आत रांगेशिवाय घुसवत होत्या. त्यास पाळेकर यांनी हरकत घेतली. त्यात सुप्रिया धुरी यांनी दमदाटी केली आणि पाळेकर यांना मारहाण केली. सर्वासमक्ष धुरी यांनी मला खाली पाडून मारहाण केली, असा आरोप पाळेकर यांनी केला. इतर पोलीस मदतीला आले आणि माझी सुटका झाली असे त्या म्हणाल्या. लालबागचे कार्यकर्ते पोलिसांनाही सोडत नाहीत. मी बंदोबस्ताला जाण्यापूर्वीच तिला सावध राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे कविताचे वडील गोविंद पाळेकर यांनी सांगितले. काळाचौकी पोलिसांनी सुप्रिया धुरी हिला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. मंगळवार उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
मनोज मिश्राला जामीन
पोलीस उपनिरीक्षक अशोक शरमाळे यांना मारहाण करणारा मंडळाचा कार्यकर्ता मनोज मिश्रा याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी त्याला शिवडी येथील न्यायालयात हजर केले असता त्याची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला संघटनांची निदर्शने
*‘लालबागचा राजा’च्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना आणि महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे.
*‘देशभक्ती आंदोलन’ या संघटनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी गेट क्रमांक २ समोर मुक निदर्शने करून आपला निषेध नोंदविला.
* त्यांनाही लागबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हाकलून देण्याचा प्रयत्न करत त्यांच्याशी बाचाबाची केली. पोलिसांनी या महिला कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन नंतर सोडून दिले.
* मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांचा विनयभंग होत आहे त्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी देशभक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यां अविषा कुलकर्णी यांनी केला.