मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले असून त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावं असं सांगण्यात आलंय. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नक्की वाचा >> संजय राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा ‘दैनिक सामना’ संदर्भात मोठा निर्णय

“आम्ही सध्या रोहित कपूरचा शोध घेत आहोत. याचसंदर्भात दिघेंना समन्स पाठवण्यात आले आहे. दिघे यांच्या कुटुंबियांनी हे समन्स त्यांच्यावतीने स्वीकारलेत. त्यांनी पोलीस तपासात सहकार्य करावं असं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलंय. पोलिसांचं एक पथक या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या कपूरला पकडण्यासाठी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?

नक्की पाहा >> Thackeray vs Shinde: फडणवीसांऐवजी शिंदेंना CM बनवण्यामागील कायदेशीर कारण आलं समोर; असा आहे BJP चा मास्टर प्लॅन

मुख्यमंत्र्यांना दिला इशारा…
याच प्रकरणामध्ये दिघे यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, तर शिवसैनिकांसह तुमच्या घरावर मोर्चा काढावा लागेल, असं ते म्हणाले. केदार दिघे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, ”हा शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे. ठाणे हा शिवसेनेचा, दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल.”

नक्की पाहा >> Photos: अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर पत्नीने पाठवलेले १ कोटी ८ लाख, ३ सवलती अन् न्यायालयाबाहेर संजय राऊतांची ‘ती’ बाचाबाची

नेमकं प्रकरण काय?
केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावलं आहे, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे.