गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चर्चेची ठरलेली मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रातोरात स्थगित करण्यात आली आहे. आज अर्थात १८ ऑगस्ट रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना आदल्या दिवशी रात्री उशीरा यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं. यानुसार या निवडणुका आता स्थगित झाल्या असून त्या पुन्हा कधी होणार? यावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्नाची कसोटी लांबणीवर पडलेली आहे. तर त्यांच्यासमोर आलेल्या अमित ठाकरेंशी त्यांचा सामनाही लांबला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

मुंबई विद्यापीठातील १० सिनेट सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. एक आठवड्यापूर्वी म्हणजेच ९ ऑगस्टला यासंदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. १८ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पुढच्या महिन्यात १० सप्टेंबर रोजी मतदान तर १३ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार होता. जवळपास ९५ हजार तरुण मतदान या निवडणुकीसाठी मतदान करणार होते. पण गुरुवारी रात्री उशीरा अचानक निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर करण्यात आल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

“एक लाख रुपयांचं बक्षीस देतो, नारायण राणेंनी…”, विनायक राऊत यांचं आव्हान

राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, या निवडणुकीची मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. सर्वच विद्यार्थी संघटनांनी निवडणुकीसाठी कंबर कसली होती. ठाकरे गटाची युवा सेना व मनसेची विद्यार्थी सेना यांनी मतदार नोंदणीसाठी जोरकसपणे प्रयत्न केले होते. या दोन संघटनांमध्येच हा थेट सामना होईल असंही बोललं जात होतं. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मुंबईत होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत या दोन्ही संघटना व त्यांचे नेते, अर्थात आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

शासन निर्देशानुसार निवडणूक स्थगित

या निवडणुका आपण शासनाच्या निर्णयानुसार स्थगित केल्याची बाब मुंबई विद्यापीठानं जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केली आहे. १७ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य शासनाकडून आलेल्या पत्रातील निर्देशांनुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं मुंबई विद्यापीठ प्रशासन समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे पुढील आदेशांपर्यंत निवडणूक स्थगित करण्यात येत असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे.

मतदार नोंदणीत युवसेनेच्या ठाकरे गटाने आघाडी घेतल्याची चर्चा होती. दहा पैकी दहा जागांसाठी युवासेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात शक्ती प्रदर्शन करीत अर्ज भरणार होते. छात्र भारती विद्यार्थी संघटनेने राखीव प्रवर्गातील पाच व खुल्या प्रवर्गातील दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे निश्चित केले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाने सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जाहीर केले होते. मात्र या सगळ्यामध्ये शिंदे गटाच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती.