वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. सोमवारी सायंकाळी त्यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. याआधी हेमंत नगराळे यांच्याकडे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी होती. हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन बदली करून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजय पांडे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या पोलिसांचं प्रमुखपद भूषवलं होतं. याआधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे संजय पांडे यांच्याकडे आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. परमवीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानं नगराळे यांच्याकडं मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता संजय पांडे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

नियुक्तीनंतर लगेचच संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव असणाऱ्या संजय पांडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर मुंबईकरांचे आभार मानत थेट संपर्कात राहण्याचं आश्वासन दिलं आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुकवर चक्क स्वतःचा मोबाइल नंबर शेअर केला आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून मुंबईकरांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत, असे म्हटले आहे. “मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास ३० वर्षे मी या शहरात आणि पोलीस  दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलीसांशी तुलना होत आली आहे.  या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. जे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे! या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला ९८६९७०२७४७ या क्रमांकावर जरूर कळवा. अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल! दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत. धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा!,” असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या कालावधीतील एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय दबाव झुगारून त्यांनी केलेल्या कारवाईमुळे पांडे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतून उतरले होते. पुढे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, परंतु तो स्वीकारला नाही. त्यांनी राजानीमा परत घेतला, मात्र त्यावेळेपासून पांडे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू झाला होता.