मुंबई: पत्नीची चाकूने हत्या करून ३२ वर्षीय व्यक्तीने पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला. हत्येसाठी वापरलेला चाकू तात्काळ जप्त करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृत महिलेच्या पाठीवर, मानेवर व गळ्यावर गंभीर जखमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नववर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ

नितीन धोंडीराम जांभळे (३२) असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड पूर्व येथील कासमबाग परिसरातील रहिवासी आहे. कोमल (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. मृत महिला व आरोपी नितीन यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. पण कुटुंबियांना लग्न मान्य नसल्यामुळे ते वेगळे राहत होते. त्यातून गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. आरोपी कोमलच्या चारित्र्यावरून संशय घ्यायचा. पीडित महिलेचे वडील मालाड पूर्व येथील रहिवासी आहे.

हेही वाचा >>> बोरिवली, भायखळ्यातील सर्व बांधकामे बंद; प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा कठोर निर्णय, पालिका आयुक्तांची घोषणा

आरोपी नितीनने पीडित कोमलला त्याच्या कासमबाग येथील रामजी जोरगे चाळीतील घरी बोलावले. तेथे झालेल्या वादातून आरोपीने कोमच्या मानेवर, पाठीवर व गळ्यावर चाकूने वार केले. तिला तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर येथे नेण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर नितीन स्वतः पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला. कोमलची आई सुमन शेलार यांच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी नितीनला अटक केली. आरोपी व तक्रारदार यांच्यात वाद सुरू होते. आरोपीविरोधात यापूर्वी दिंडोशी पोलीस ठाण्यात धमकावणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai crime 32 year man arrested for killing wife in malad area mumbai print news zws