Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगावात खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीची हत्या करून पतीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू झाला असून प्राथमिक तपासातून अनेक खुलासे समोर आले आहेत.

गोरेगावातील किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. या घटनेतील (Mumbai Crime) पत्नीचा मृतदेह खोलीत तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात सापडला. त्यामुळे पत्नीची हत्या करून पतीने इमारतीवरून उडी मारल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पती सेल्समन तर, पत्नी फिजिओथेरपिस्ट होती, असंही पोलिसांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
panvel grp constable death
शेवटच्या GPay व्यवहारामुळं उलगडली मर्डर मिस्ट्री; अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासह पोलीस पतीला संपवलं
akola woman brutally murdered on Old Hingana Road
आधी गळा आवळला, मग रस्त्यावर डोके आपटले; ‘मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या महिलेची हत्या
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
Policeman killed in Navi Mumbai crime news
नवी मुंबईत पोलिसाची हत्या, मृतदेह ट्रॅकवर फेकला..
Kurla Murder Case| Daughter Murder Mother in Kurla
Kurla Murder Case : कुर्ल्यात मुलीने केली वृद्ध महिलेची हत्या

हेही वाचा >> अंथरुणाला खिळलेल्या ८० वर्षीय महिलेवर बलात्कार; हात जोडले तरीही नराधम…, न्यायालयाने सुनावली शिक्षा

आत्महत्या करण्यापूर्वी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती, मालमत्तेची माहिती दिली. तसंच दिल्लीत राहणाऱ्या मुलाला फ्लाईटचं तिकीट पाठवून रात्री ९ पर्यंत मुंबईत येण्यास सांगितलं, असं पोलीस तपासातून समोर आलं आहे. किशोर पेडणेकर यांच्या आत्महत्येचा (Mumbai Crime) तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी संबंधित प्रकरणात त्यांच्या मुलाला मुंबईला बोलावलं असून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात प्रथम महिलेचा खून झाला असावा आणि नंतर पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असं आढळून आलं की किशोर पेडणेकर हे तणावात आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते. डॉ. राजश्री पेडणेकर या मालाड इथल्या एका आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या. त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो. एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी किशोर पेडणेकर यांनी एक मेसेजही पाठवला आहे. ज्यामध्ये त्यांना मालमत्तेचा तपशील आणि नॉमिनीचं नाव पाठवलं आहे.

मृतदेहाच्या गळ्यात सापडल्या चाव्या

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक आयुक्त रेणुका बागडे म्हणाल्या, “२ ऑगस्ट रोजी गोरेगाव पश्चिम येथून फोन आला की एक मृतदेह सापडला आहे. गोरेगाव पोलीस तिथे पोहोचले आहेत. सारस्वत बँकेच्या एटीएम शेजारी हा मृतदेह (Mumbai Crime) सापडला. मृतदेह घेऊन रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं. नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याकरता सोसायटीतील लोकांशी संपर्क साधला गेला. त्यांच्या पत्नीशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्यांची पत्नी फोन उचलत नव्हती. मृतदेहाच्या गळ्यात तीन चाव्या होत्या. या चाव्यांच्या सहाय्याने पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांना त्यांची पत्नी मृतावस्थेत आढळली. त्यांचा गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं.”

मी जिवंत नसेन…

“ज्यावेळी हे दोन्ही मृतदेह सापडले त्यानंतर जो तपास झाला त्यानुसार किशोर पेडणेकर यांनी पत्नीचा चादरीच्या सहाय्याने गळा दाबून हत्या (Mumbai Crime) केली असल्याचं निष्पन्न झालं. गेले दोन-अडीच वर्षे ते तणावात होते. तसंच, त्यांना उच्च मधुमेहही होता. हे कृत्य करण्याआधी सकाळी चार वाजता त्यांनी एका नातेवाईकाला त्यांच्या बँक आणि मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली होती. तसं, मी जिवंत नसेन असंही त्यांनी या मेसेजमध्ये लिहिलं होतं. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता किशोर पेडणेकर यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा दिल्लीला कामाला आहे. तपासात असंही आढळली की आत्महत्यापूर्वी नातेवाईकाचं आणि मुलाचं तिकिट बुक केलं होतं. त्यानंतर मेसेजही केला होता की त्याला इथ आणा. मुलाशी अजून संपर्क झाला नसून तपास सुरू आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Story img Loader