Mumbai Crime : पत्नीने पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला त्याचप्रमाणे दुसऱ्या बाईपासून त्याला मूल झाल्याचाही आरोप केल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीविरोधात आणि त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेने असंही पोलिसांना सांगितलं की जेव्हा पतीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती आणि त्याला दुसऱ्या बाईपासून मूल असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याने मला घरातून हाकलून दिलं. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतल्या वरळी भागात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी नेमकं या घटनेबाबत काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी भागात राहणाऱ्या महिलेने दक्षिण मुंबई पोलिसांकडे तिच्या पतीविरोधात आणि त्याच्या आई वडिलांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांच्या अन्वये सदर पतीवर आणि त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये फसवणूक, क्रौर्य, धमकी देणे यांसारखी कलमं आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सदर महिलेचा जबाबही नोंदवला आहे. या महिलेने असाही आरोप केला आहे की तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या आई वडिलांनी दिलेलं सोनंही बळकावलं आहे.

Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
Image of a related graphic, a photo representing the incident, or a picture of a pride flag
Same Sex Marriage : वहिनीशी लग्न करण्यासाठी तरुणीचा हट्ट, कुटुंबीयांनी नकार देताच प्यायली विष
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम

डिसेंबर २०२४ मध्ये विवाह

सदर महिलेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतल्या या माणसाशी तिचा विवाह १४ डिसेंबर २०२४ या दिवशी झाला होता. दोघांच्या घरातल्या लोकांच्या संमतीने हे लग्न झालं होतं. तसंच लग्नात या महिलेला तिच्या आई वडिलांनी सोन्याचे दागिने केले होते. हे दागिने पतीसह त्याच्या आई वडिलांनी बळकावले आहेत असं आता या महिलेने म्हटलं आहे. या महिलेने सांगितलं की ती तिच्या सासरच्या लोकांकडे पुण्याला गेली होती. त्यानंतर महिनाभराने ती लग्न झालेल्या घरी म्हणजे तिच्या सासरी परतली. महिलेने सांगितलं मी जेव्हा परत आले तेव्हा माझ्या सासरच्या लोकांनी माझे सोन्याचे दागिने लपवल्याचं लक्षात आलं. मी जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा तो म्हणाला ते तुझे दागिने नाहीत आमचेच आहेत.

फोनवर पतीला बोलताना ऐकलं आणि महिलेला संशय आला

यानंतरची घटनाही या महिलेने सांगितली, ती तिच्या तक्रारीत म्हणाली, “माझ्या पतीला एका दुसऱ्या महिलेने फोन केला होता. त्यावेळी माझा पती तिला सांगत होता की आमच्यात अद्याप शरीरसंबंध प्रस्थापित झालेले नाहीत. यानंतर माझा पती मला फसवतो आहे, त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय मला आला.” या महिलेने सांगितल्याप्रमाणे पुढे काही दिवसांमध्ये तिचा हा संशय बळावला. त्यानंतर तिने पतीच्या आई वडिलांनाही हे सांगितलं. तिचे आई वडील आणि पती तिघांनीही तिला सांगितलं तू जो काही विचार करते आहेस तो काल्पनिक आहे. तिच्या पतीच्या आईने सांगितलं आमचा मुलगा त्याच्या मित्राशी फोनवर बोलतो. त्याचा मित्र त्याला चिडवण्यासाठी महिलेचा आवाज काढतो असंही सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

पतीला विचारणा केल्यावर नेमकं काय म्हणाला?

यानंतर महिलेने पतीचा फोन कसाबसा मिळवला आणि त्यातील Whats App चॅट वाचले. त्यावेळी तिला समजलं की तिचा पती दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून आहे. तसंच त्या दोघांना मूल आहे. आता ही बाब समोर आल्यानंतर महिलेच्या पतीने दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचं मान्य केलं. मागच्या चार वर्षांपासून त्याचे संबंध आहेत हेदेखील सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या पतीने ज्या महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यात आले आहेत तिला दोन मुलं आहेत. या सगळ्या प्रकारानंतर महिलेने तिच्या पतीला विचारलं की जर तुझं अफेअर सुरु होतं, शरीरसंबंध त्या महिलेशी होते तर मग माझ्याशी लग्न का केलं? त्यावर मी तुम्हाला दोघींनाही सांभाळेन असं उत्तर त्याने दिलं. ज्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि सदर महिलेला तिच्या पतीने आणि घरातल्यांनी घराबाहेर हाकलून दिलं. आता या प्रकरणात महिलेच्या पतीविरोधात आणि सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader