वित्त संस्थांना गंडा घालणारी टोळी अटकेत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : सोन्याच्या दागिन्यांवर खडे बसवण्यासाठीच्या कोंदणांत शिसाचा वापर करून तीन राजस्थानी कारागिरांनी शहरातील नामांकित बँका, कर्ज देणाऱ्या खासगी संस्थांसह सराफा व्यापाऱ्यांना कोटय़वधींचा गंडा घातल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली. या भामटय़ा कारागिरांसह सहा जणांच्या टोळीला गेल्या आठवडय़ात गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बेडय़ा ठोकल्या होत्या.
दिनेश सोनी, रमेश सोनी आणि विमल सोनी अशी कारागीर भावंडांची नावे आहेत. त्यांनी आजारपण, लग्नकार्य, गृह खरेदी, कर्जाचा डोंगर अशा थापा मारत बँका, खासगी संस्थांमध्ये सोन्याचे दागिने गहाण ठेवत तीन वर्षांपासून फसवणुकीचे सत्र सुरू ठेवले होते. प्रत्येक ठिकाणी या टोळीने स्वत: बनवलेल्या विशेष धाटणीच्या बांगडय़ा आणि कानातलेच गहाण ठेवल्याचे स्पष्ट झाले.
गोम अशी की बांगडयांवर खडे बसवण्यासाठी राखून ठेवलेल्या कोंदणात एक ग्रॅम सोने भरणे आवश्यक असते. सराफा बाजारात तसा नियमच आहे. ही टोळी मात्र कोंदणांमध्ये सोन्याऐवजी शिसे भरत असे. गहाण ठेवण्यासाठी बनवलेल्या प्रत्येक बांगडीत तब्बल ३० खडे असत. त्यामुळे या बांगडीतल्या एकूण कोंदणांमध्ये तीस ग्रॅम सोन्याऐवजी शिसे असे.
कर्ज देण्यापूर्वी बँका, संस्था गहाण पडणारे दागिने वरवर(२५ मायक्रॉनपर्यंत) तपासतात. खडे उचकटून पोकळीत सोनेच आहे का हे कोठेही तपासले जात नाही. त्यामुळे खडय़ांच्या कोंदणांत सोनेच आहे असे समजून बांगडय़ा, कानातल्या दागिन्यांचे वजन होणार, बाजारभावाप्रमाणे या दागिन्यांची किंमत ठरवली जाणार आणि त्या किमतीच्या ५० ते ७० टक्के रक्कम कर्ज म्हणून मंजूर होणार, ही प्रक्रिया टोळीप्रमुख दिनेशला माहीत होती. हप्ते चुकवल्यानंतर ठरावीक मुदतीपर्यंत बँक, संस्था नोटीस जारी करेल, शोधाशोध करेल आणि कर्जदार नाहीच सापडले तर गहाण पडलेल्या दागिन्यांचा लिलाव करून आपले येणे वसूल करेल, हेही दिनेशला ठाऊक होते.
टोळीने या पद्धतीने दुहेरी फायदा करून घेतला. चपखलपणे शिसे भरून दागिन्यांचे वजन आणि किंमत वाढवून घ्यायची. त्याआधारे कर्जाची मोठी रक्कम मिळवायची. ती वापरायची. पुढे लिलावातून मिळालेल्या रक्कमेतून बँकेने येणे वसूल करून उरलेली रक्कमही मिळवायची. एका प्रकरणात लिलावातील चार तोळयांचे दागिने विकत घेणाऱ्या सराफाच्या हाती फक्त पाच ग्रॅम सोने पडले. उर्वरित ३५ ग्रॅम शिसे होते.
या संपूर्ण प्रकारात सर्वाधिक फटका लिलावात दागिने विकत घेणाऱ्यांना बसल्याचे निरीक्षण तपासकर्ते अधिकारी नोंदवतात. अस्सल दागिने कमी किमतीत मिळतील म्हणून ते फायदा गृहीत धरून जास्तीत जास्त बोली लावून ते विकत घेतात. प्रत्यक्षात त्याच्या पाच टक्केही सोने या दागिन्यांमध्ये नसते, असे एका अधिकाऱ्याने लोकसत्ताला सांगितले.
९५ लाखांचे कर्ज
तपासादरम्यान या टोळीने अलीकडेच एका खासगी वित्त संस्थेकडून दागिने गहाण ठेवून ९५ लाखांचे कर्ज मिळवल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली. हे कर्ज मिळवण्यासाठी टोळीने दीड कोटी रुपये किंमत असलेले दागिने गहाण ठेवले असावेत, असा अंदाज आहे. या दागिन्यांमध्ये सोने किती आणि शिसे किती याचीही माहिती मालमत्ता कक्ष घेणार आहे.
समभागांत गुंतवूणक
अशा फसवणुकीतून हाती आलेला पैसा आरोपींनी शेअर बाजारात गुंतवला. त्यात त्यांना तोटा झाला आणि ते कर्जबाजारी झाले, अशी माहिती पुढे येत आहे. या माहितीच्या खातरजमेसह टोळीने अन्य शहरांतही अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का, याबाबत चौकशी सुरू आहे.