Mumbai Crime मुंबईत १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी काका आणि त्यांच्या कुटुंबासह राहात होती. २४ फेब्रुवारीला शाळा सुटल्यापासून ती बेपत्ता होती. २६ फेब्रुवारीला मुलीच्या काकांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर २७ तारखेच्या सकाळी ही पीडिता दादर रेल्वे स्थानकाजवळ आढळली. रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

१२ वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनकडे सोपवलं दादरच्या जीआरपी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. यानंतर पोलिसांना या मुलीने सांगितलं की तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आहे. या मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली.

दादर पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला

दादर रेल्वे पोलिसांनी तातडीने जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला, पीडित मुलीच्या जवाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदा अंतर्गत पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणारे पाचही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सध्या जोगेश्वरी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून पुढील तपास करत आहेत. पिडीत मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक सुरू आहे.

नेमकी घटना काय घडली?

पीडित मुलगी जोगेश्वरीत नातेवाईकाबरोबर राहते. २४ फेब्रुवारीच्या दिवशी ती बेपत्ता झाली होती. मुलगी एकटी असल्याचं बघून पाच नराधम मुलीला त्यांच्या संजय नगर जोगेश्वरी येथील घरी घेऊन गेले आणि त्यानंतर या नराधमांनी मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.त्यानंतर २७ फेब्रुवारीला पीडित मुलगी रेल्वे पोलिसांना दादर स्थानकात सैरभैर अवस्थेत सापडली. रेल्वे पोलिसांनी तिला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या चौकशीत तिच्यावर जोगेश्वरी परिसरात लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळाली. यावरून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या जबाबानंतर गुन्ह्यात सामूहिक बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो ) कायदा अंतर्गत कलमाची वाढ करून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Story img Loader