मुंबईत १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाण्यात गुंगीचं औषध मिसळून त्या मुलीला प्यायला दिलं. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. अब्दुल मोतिन खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. ians या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
नेमकी काय घडली घटना?
पीडित तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवण्यात आलं. लिफ्ट दिल्यानंतर तिला तरुणांनी घरी सोडतो असं सांगितलं. त्यानंतर तिला प्यायला पाणी दिलं. या पाण्यात गुंगीचं औषध मिसळलं होतं. पीडित तरुणीला ते पाणी देण्यात आलं. पाणी प्यायल्यामुळे तिला गुंगी आली. ज्यानंतर दोन तरुणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी
पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचं समजलं. त्यावेळी आरोपीने तिला ठार मारण्याची धमकी दिली. ही तरुणी घरी आल्यानंतर तिने घरातल्यांना ही घटना सांगितली. ज्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना ही माहिती मिळताच तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेण्यात सुरुवात केली. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे ज्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे पण वाचा बाणेर भागात नामांकित रुग्णालयात सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार,पर्यवेक्षक गजाआड
मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात २९ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचं पीडित महिलेने तक्रारीत म्हटले होते. मुंबई हे मगाराष्ट्रातलं २४ तास जागं असणारं शहर आहे. या शहरात या अत्याचारांच्या घटना वाढू लागल्याने चिंता व्यक्त होते आहे. शहराच्या पुरोगामित्वाला तडे जाणाऱ्या काही घटना घडल्या आणि इथल्या सामान्य स्त्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकार आणि प्रशासनानं गस्त पथक, निर्भया पथक, स्कॅन कोड वगैरे योजना आणल्या आहेत. तरीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. अशा प्रकारे घडणाऱ्या घटना हेच अधोरेखित करत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd