काँग्रेस नेते आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख गँगस्टर गोल्डी ब्रार म्हणून केली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुंबईच्या मालाडमध्ये बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोल्डी ब्रार हा कॅनडचा असून सध्या फरार आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी त्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे गोल्डी ब्रार पोलिसांच्या रडारवर आहे. एवढंच नव्हेतर गोल्डी ब्रार याने यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खान यालाही धमक्या दिल्या होत्या.

अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक आणि वकील विक्रम कपूर यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विक्रम कपूरच अस्लम शेख यांना आलेले फोन उचलतात. अस्लम शेख यांना ५ ऑक्टोबर रोजी फोन आला असल्याची माहिती कपूर यांनी तक्रारीत दिली आहे.

हेही वाचा >> ट्युशनला जाते सांगून मुलुंड स्टेशनला आली, फलाटावर ट्रेन येताच शांतपणे रुळांवर उतरली अन्…, धक्कादायक घटना समोर

फोन करणार्‍याने स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार अशी करून दिली. “मी गोल्डी ब्रार बोलत आहेत. मी अस्लम शेखला दोन दिवसांत गोळ्या घालून मारणार आहे. हे अस्लम शेखला सांगा”, असा फोन विक्रम कपूर यांना आला. हा फोन येताच कपूर यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. फोनचे तपशीलही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

कपूर यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६(२) आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच, पुढील तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.