Mumbai Crime : मुंबईतलं दादर स्टेशन हे कायम गर्दीने गजबजलेलं असतं. त्या ठिकाणी प्रवाशांची कायमच मोठ्या प्रमाणावर ये जा असते. अशात एका बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह ( Mumbai Crime ) आढळल्याने खळबळ उडाली आहे. दादर स्टेशनच्या फलाट क्रमांक ११ वर पोलिसांच्या नजरेतून ही घटना सुटली नाही त्यामुळे पोलिसांनी चार तासात दोन आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

Mumbai Crime दादरच्या फलाट क्रमांक ११ या ठिकाणी दोन मूकबधिर व्यक्ती तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढत होते. त्यांच्याकडे चाकं असलेली ट्रॉली बॅग होती. ही बॅग ट्रेनमध्ये चढवत असताना दोघांची खूप दमछाक झाली. बॅगेच्या वजनामुळे दोघांनाही घाम फुटला होता. ही गोष्ट रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस माधव केंद्रे यांच्या नजरेतून सुटली नाही. या दोघांच्या हालचालीही संशयास्पद वाटल्या. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी थांबवलं आणि बॅग उघडायला सांगितलं. बॅग उघडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला कारण बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह ( Mumbai Crime ) होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते. पोलिसांनी या प्रकरणात ( Mumbai Crime ) दोघांनाही ताब्यात घेतलं आणि बॅगही ताब्यात घेतली तसंच पुढील तपास सुरु केला. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार बॅगेत आढळलेला मृतदेह ( Mumbai Crime ) हा अर्शद अली सादिक शेख याचा होता. अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना भागात राहण्यासाठी आला होता. शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिर व्यक्तींनी त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची कोकणात जाऊन विल्हेवाट लावायची असं त्यांनी ठरवलं. त्यामुळे एका ट्रॉली बॅगमध्ये हा मृतदेह त्यांनी भरला. तुतारी एक्स्प्रेसने ते दोघंही कोकणात चालले होते. मात्र पोलिसांना त्यांच्यावर संशय आला, तसंच जड बॅगेत काय आहे ? हे पोलिसांनी वेळीच जाणून घेतलं त्यामुळे गुन्ह्याची उकल झाली. शिवजीत सिंह आणि प्रवीण चावडा या दोघांनी अर्शदची हत्या ( Mumbai Crime ) केली असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हे पण वाचा- लग्न कधी करतोस? असं सारखं विचारल्यामुळे वैतागलेल्या तरूणाने केली शेजाऱ्याची हत्या

शिवजीतला उल्हासनगरहून अटक

ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवजीत सिंह हा दादर स्थानकातून पळून गेला होता. पोलिसांनी प्रवीण चावडाकडून त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्याचा माग काढत त्याला उल्हासनगरहून अटक केली. खुनासाठी वापरण्यात आलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी आता दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या दोघांना आता न्यायालयात हजर केलं जाईल.