मुंबईः मालवणी पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली. अनिलकुमार सिंह आणि अंकित जैस्वाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वसईमधील रहिवासी आहेत. पोलिसांनी या दोघांकडून दहा किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे.

मालाडच्या मालवणी परिसरात काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलीस पथकाने साध्या वेशात परिसरात पाळत ठेवली होती. दोन संशयीत तरुण तेथे आले. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर पोलिसांना दहा किलो गांजा सापडला. त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. हा साठा जप्त करून त्यांना पुढील कारवाईसाठी मालवणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी अनिलकुमार आणि अंकितला अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

हेही वाचा – मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही

हेही वाचा – दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या

अनिलकुमार आणि अंकित हे दोघेही पालघर जिल्ह्यातील वसई येथील रहिवासी असून खासगी कंपनीत कामाला आहेत. ते दोघेही मालवणी परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आले होते, असा संशय आहे. गांजाची विक्री केल्यानंतर त्यांना काही रक्कम मिळणार होती. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Story img Loader