मुंबई : पवई येथील मोरारजी नगर परिसरातील साकी विहार रस्त्याजवळील ५ फूट खोल खड्ड्यात आढळलेल्या सुमारे पाच फुटी मगरीची गुरुवारी रात्री सुटका करण्यात आली. ‘रॉ’(रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर) या प्राणी संघटनेचे कार्यकर्ते आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘मार्श’ प्रजातीच्या ४.६ फुटांच्या नर मगरीची सुटका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साकी विहार रस्त्याजवळील खड्ड्यामध्ये मगर असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांकडून रॉ संघटनेला मिळाली. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य हाती घेतले. संपूर्ण खड्ड्यावर जाळी आच्छातून मगरीला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मगर जाळ्यात येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अखेर रात्री १०.३० च्या सुमारास मगर जाळ्यात सापडल्यानंतर तिची रॉच्या पशुवैद्यकीय पथकाने वैद्यकीय तपासणी केली. मगर सुरक्षित असल्याचे घोषित केल्यानंतर मुंबई परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांच्या मदतीने मगरीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

हेही वाचा – मुंबई पोलीस दलात सप्टेंबरमध्ये सात हजारांहून अधिक कर्मचारी सेवेत

हेही वाचा – वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास : ५५० घरांचा ताबा मार्च २०२५ मध्ये

मगरीची सुटका करण्यात आलेले ठिकाण पवई तलावाजवळ आहे. पवई तलावात मगरींचा अधिवास असून अनेकदा मोठ्या मगरी पवई तलावातून विहार तलावाकडे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मगर या भागात आल्याची शक्यता रॉचे पवन शर्मा यांनी वर्तविली. अन्नाच्या शोधात किंवा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडली असावी, असा अंदाज शहा यांनी व्यक्त केला. मगरीची प्रकृती उत्तम असल्याने गुरुवारी रात्रीच तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला वनविभागाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अटक केली होती.