अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली आहे. एनसीबीने म्हटले आहे की, त्याच्या फोनमध्ये चॅटच्या स्वरूपात धक्कादायक आक्षेपार्ह सामग्री सापडली आहे, जी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीकडे इशारा करते. रविवारी न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना एकदिवसाची एनसीबी कोठडी सुनावल्यानंतर सोमवारी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एनसीबीने तिघांना कोर्टापुढे हजर करण्यापूर्वी जेजे रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यानंतर पुन्हा एनसीबीचे अधिकारी कार्यालयाकडे गेले. सुनावणीदरम्यान एनसीबीने कोर्टाकडे आर्यन खान याची मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली. यावेळी एनसीबीने आर्यनच्या फोनमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीकडे संदर्भात चॅट सापड्याचे म्हटले. त्यात पुढे ड्रग्सच्या वितरणासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा उल्लेख आहे. छापा टाकल्यानंतर पुरवठादाराकडे व्यावसायिक प्रमाण ड्रग्स सापडले आहे. सर्व आरोपी एका टोळीशी जोडलेले आहेत आणि हे एक रॅकेट आहे असे एएसजी अनिल सिंह यांनी म्हटले आहे.

“ड्रग्स घेणे खूप सामान्य झाले आहे. कुटुंबे आणि लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरुण या हायप्रोफाइल लोकांना त्यांचे आदर्श मानतात. म्हणूनच आम्ही ड्रग्सचा वापर रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या १ वर्षापासून किंवा ३ वर्षांपासून नियमितपणे ड्रग्स घेत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याशिवाय तपासकर्ता तपशील कसा मिळवू शकतो. तो कोणाकडून ड्रग्स घेत आहे हे कसे शोधायचे? टोळी कशी काम करते?,” असा एएसजी सिंह यांनी युक्तिवाद केला.

एनसीबीचे धाडसत्र सोमवारी पहाटेही सुरु होतं. याच प्रकरणासंदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ पुरवणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने श्रेयस नायरला याप्रकरणी ताब्यात घेतलं. ज्याने कथितपणे आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंटला ड्रग्स पुरवले होते.