मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पायाभूत कामे सुरू आहेत. या कामांमुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांना फटका बसणार आहे. या रेल्वेगाड्या ३० ऑगस्टपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाणे आणि दादरपर्यंतच धावतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
हेही वाचा…भारतीय लष्कराच्या जाँबाज अधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले द्रास-कारगील!
सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली.