मुंबई : मध्य रेल्वेवरील सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०-११ च्या विस्तारीकरण करून २४ डब्यांची रेल्वेगाडी उभी करण्यासाठी पायाभूत कामे सुरू आहेत. यासाठी १ जून रोजी रात्री १२.३० वाजेपासून ते २ जून रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ३६ तासांचा ब्लाॅक घेतला आहे. यावेळी मुंबई-पुणे धावणाऱ्या रेल्वेगाड्यासह वंदे भारत, जनशताब्दी, तेजस, पंचवटी, राज्यराणी, महालक्ष्मी, गरीब रथ, तपोवन या रेल्वेगाड्याही रद्द होणार असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड अप आणि डाऊन मार्गादरम्यान, मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते भायखळा अप आणि डाऊन धीम्या-जलद मार्गादरम्यान ३६ तासांचा ब्लाॅक असेल. ब्लाॅक कालावधीत सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक, पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. तसेच सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. तसेच लोकल सेवा कोलमडणार आहे.
हेही वाचा : मुंबई : ६२ वर्षे जुन्या पुलाच्या तुळ्या बदलल्या
३१ मे रोजी अप रेल्वेगाड्या रद्द
हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस, हावडा –सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस, नांदेड –सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
१ जून रोजी अप रेल्वेगाड्या रद्द
पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, जालना- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस, जालना- सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस, सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, साई नगर शिर्डी- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव- सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, हैदराबाद- सीएसएमटी हुसेन नगर एक्स्प्रेस, कोल्हापूर- सीएसएमटी महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड- सीएसएमटी राज्य राणी एक्स्प्रेस, जबलपूर- सीएसएमटी गरीब रथ एक्स्प्रेस
हेही वाचा : सोलापूर : लग्नाळू तरूणांना लुबाडणारी टोळी सापळ्यात अडकली
१ जून रोजी डाऊन रेल्वेगाड्या रद्द
सीएसएमटी -नांदेड तपोवन एक्स्प्रेस, सीएसएमटी -मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी -साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस
२ जून रोजी अप रेल्वेगाड्या रद्द
मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, जालना–सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
हेही वाचा : मुंबई : आध्यात्मिक गुरूचा पणतू असल्याचे भासवून डॉक्टरची ४२ लाखांची फसवणूक
२ जून डाऊन गाड्या रद्द
सीएसएमटी -मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -नांदेड तपोवन एक्स्प्रेस, सीएसएमटी -मडगाव तेजस एक्स्प्रेस, सीएसएमटी -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस, सीएसएमटी -जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी -जालना वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस, सीएसएमटी -सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी -हावडा दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी -नांदेड राज्य रानी एक्स्प्रेस, सीएसएमटी -कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, सीएसएमटी -पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, सीएसएमटी -हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस