मुंबई : ताडदेव येथील आंतरराष्ट्रीय शाळेची मॅन – इन – द – मिडलद्वारे ८७ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. सायबर पोलिसांकडे तत्काळ तक्रार करण्यात आल्यानंतर यापैकी ८२ लाख ५५ हजार रुपये वाचवण्यात यश आले आहे. ही रक्कम शाळेला परत करण्यात आली आहे.

ताडदेवमधील आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये कॅफेटेरियाचे बांधकाम करायचे होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॅफेटेरियाच्या बांधकामाचे कंत्राट युनायटेड अरब अमिरातीमधील (युएई) युरोफोन अकोस्टिक्स कंपनीला देण्यात आले होते. कॅफेटेरियाबाबत बोलणी झाल्यानंतर त्यांना कंपनीच्या नावाने एक ई-मेल आला. युएईममधील कंपनीने त्या ई-मेलमध्ये बांधकामाच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम आगाऊ देण्याची मागणी केली होती. आरोपींनी या कंपनीच्या ई-मेलशी साधर्म्य असलेला ई-मेल तयार केला. त्यात अमेरिकेतील वेल्स फार्गो बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्याबाबत शाळेला ई-मेल पाठविण्यात आला होता. शाळा व्यवस्थापनाने १६ मार्च रोजी त्यांच्या बँक खात्यातून या नव्या ई-मेलमध्ये दिलेल्या बँक खात्यामध्ये ८७ लाख २६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर तक्रारदार कंपनीने युएईतील कंपनीसोबत संपर्क साधला असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शाळा प्रशासनाने तत्काळ याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा

हेही वाचा – विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी

याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मध्य प्रादेशिक परिमंडळाच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक, तोतयागिरी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासणीत ते मॅन – इन – द – मिडल सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून फसवणुकीतील रक्कम गोठवण्यास सांगितले. त्यानुसार ८२ लाख ५५ हजार रुपये गोठवण्यात आले. ती रक्कम शाळेला परत करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader