मुंबई : मालाड येथील २६ वर्षीय डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आईस्क्रीम उत्पादकाच्या अज्ञात कर्मचाऱ्याविरूद्ध तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

तक्रारदार डॉ. ब्रँडन फेर्रावने रशियातून एमबीबीएसची पदवी मिळवली असून ते नानावटी रुग्णालयात कामाला होते. सध्या ते पदव्युत्तर शिक्षण घेत असून ते घरी अभ्यास करीत होते. त्याच्या बहिणीने बुधवारी सकाळी ऑनलाईन वस्तू पुरवणाऱ्या कंपनीमार्फत युम्मो आइस्क्रीमच्या तीन कोनसह अन्य काही किराणा वस्तू मागवल्या होत्या. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार दुपारी आईस्क्रीम खात असताना त्यात मांसाचा तुकडा सापडला. तो तुकडा त्यांनी काळजीपूर्वक पाहिला असता तो नखासह बोटाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ब्रँडन यांना मळमळू लागले.

shocking video
“तोंड टॉयलेट सीटमध्ये कोंबलं वरुन पाणी टाकलं अन्…” वृद्ध महिलेबरोबर घडली थरारक घटना, धक्कादायक VIDEO VIRAL
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gas leak during excavation in Vasai Agarwal Nagari
वसई: खोदकाम करताना गॅस गळती, रहिवाशांमध्ये घबराट
Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
Amruta Khanvilkar Skincare Routine
Video: अमृता खानविलकरने सांगितले तिच्या तजेलदार त्वचेचे रहस्य, म्हणाली, “वर्कआउटनंतर…”
Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
Prakash Abitkar marathi news
आरोग्य संस्थांना महिन्यातून किमान दोन वेळा अचानक भेटी द्या, आरोग्य मंत्र्यांच्या आरोग्य विभागातील वरिष्ठांना सूचना
us shocking video viral
निर्दयी बाप! कारवरील बर्फ साफ करण्यासाठी ३ महिन्यांच्या बाळाबरोबर केलं जीवघेणं कृत्य; धक्कादायक VIDEO व्हायरल

हेही वाचा…अखेर धारावीकरांनी बंद पाडले अदानीचे सर्वेक्षण, अनिल देसाई आणि वर्षा गायकवाड उद्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार

या प्रकारानंतर तात्काळ त्यांनी आईस्क्रीम उत्पादक कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. परंतु कंपनीकडून तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मालाड पोलिसांशी संपर्क साधला आणि आईस्क्रीममध्ये सापडलेला मांसाचा तुकडा त्यांना दाखवला. आईस्क्रीम वितळण्याआधी त्याने पोलीस तक्रार नोंदवण्याआधी त्याचे छायाचित्र व चित्रफीत तयार केली होती. डॉक्टरांच्या तक्रारीवरून, मालाड पोलिसांनी युम्मोच्या अनोळखी कर्मचाऱ्याविरूद्ध भादंवि कलम २७२ (खाद्यपदार्थात भेसळ करणे), २७३ (हानीकारक बनलेले खाद्यपदार्थ किंवा पेय विकणे) आणि ३३६ (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे मांस माणसाचे आहे की कोणत्या प्राण्याचे हे तपासण्यात येणार आहे. त्यासाठी ते न्यायवैधक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader