मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव ११ वा १२ जून रोजी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता हा ई-लिलाव लांबणीवर पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई-लिलावासाठी अनामत रक्कमेसह अंदाजे ५५० अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे हे ५५० अर्जदार प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ई-लिलावपूर्व प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर मंडळाने या दुकानांचा मंगळवारी (११ जून) वा बुधवारी (१२ जून) ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तांत्रिक कारणे पुढे करीत हा लिलाव लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : महायुती आणि मविआमध्ये माघारनाट्य; उद्धव ठाकरेंशी संपर्कच होत नाही, नाना पटोले यांची हतबलता

दुकानांच्या ई-लिलावासाठी म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. मात्र यात काही त्रुटी असून त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये या दुकानांचा ई-लिलाव होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai e auction of 173 shops postponed mumbai print news css
Show comments