मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील ‘नेओपोलिस’ टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचलनालयाने (ईडीे) घेतला आहे. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात ईडीने एप्रिल २०२२ मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये कासकरविरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहेत. त्यानंतर हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. कासकर, त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेत बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहताकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती. सुमारे ७५ लाख रुपयांचे मूल्य असलेली ही सदनिका बळजबरीने शेखच्या नावावर करण्यात आली होती. तसेच बनावट धनादेशाद्वारे १० लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते.

ईडीने दोन गु्न्ह्यांच्या आधारावर याप्रकरणी चौकशीला सुरूवात केली होती. त्यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआरए) दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा व दुसरा गुन्हा इक्बाल कासकर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खंडणी स्वीकारल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केला होता.

Sunil Yadav assassination
Lawrence Bishnoi Gang : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादवची हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ladki Bahin Yojana
Maharashtra News LIVE Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा…एमएमआरडीएच्या नऊ विकास प्रकल्पांना गती, वाहतूक पोलिस विभागाशी रखडलेल्या संबंधित परवानग्या मिळविण्यात यश

अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे मूळ लपवण्यासाठी केलेले व्यवहार ईनेने चौकशीत उघड केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये कासकरची चौकशी केली. त्यात त्याने भारतातील दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांबाबतची माहिती दिली. आरोपींच्या घरांवर छापे टाकल्यानंतर एप्रिल २०२२ पर्यंत ठाणे पोलीस अहवालाच्या पुराव्यांसह मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि भारतीय दंड संहिताअंतर्गत खंडणी व कट रचणे याबाबतच्या संबंधित कलमांचा समावेश होता.

हेही वाचा…प्राण्यांच्या दहनवाहिनीच्या खर्चात बचत, गॅसची देयके १ लाखावरून ४० हजारांवर; दिवसातून दोनवेळा दहनविधी

युनायटेड अरब अमिरातीमधून (यूएई) २००३ मध्ये परत पाठवण्यात आलेल्या इक्बाल कासकरने भारतात दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यास सुरूवात केली. कराची येथे वास्तव्यास असलेल्या दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचे मानले जाते, त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि सुरक्षेच्या पातळीवर अधिक महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय एनआयएनेही दाऊदच्या विविध कारवायांप्रकरणी देशभरात कारवाई केली.

Story img Loader