मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील ‘नेओपोलिस’ टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचलनालयाने (ईडीे) घेतला आहे. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात ईडीने एप्रिल २०२२ मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये कासकरविरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहेत. त्यानंतर हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. कासकर, त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेत बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहताकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती. सुमारे ७५ लाख रुपयांचे मूल्य असलेली ही सदनिका बळजबरीने शेखच्या नावावर करण्यात आली होती. तसेच बनावट धनादेशाद्वारे १० लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा