स्वस्त आणि पौष्टिक अन्नपदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंड्यांच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली असून, काही महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात ६० ते ६३ रुपये प्रतिडझन दराने मिळणारी अंडी सध्या ७५ ते ८४ रुपयांना विकली जात आहेत. अंड्यांच्या दरात झालेल्या वाढीचा सर्वसामान्यांबरोबरच अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही फटका बसला आहे. राज्यात अंड्यांचा निर्माण झालेला तुटवडा, तसेच पशुखाद्य महागल्याने अंड्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हिवाळ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेली अंडी खाण्याकडे मांसाहारींचा कल असतो. परिणामी, अंड्यांच्या मागणीत वाढ होते आणि त्याच्या किमतीही वधारतात. मात्र यंदा आणखी काही कारणांमुळे अंड्यांचे दर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी पशुखाद्याच्या किंमतीत झालेल्या दरवाढीचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना फटका बसला होता. कोंबड्यांच्या प्रजननाची कालमर्यादा उलटून गेल्यानंतर अंड्यांच्या उत्पन्नासाठी नवीन कोंबड्या आणल्या जातात. परंतु, पशुखाद्याचे भाव वाढल्याने अनेक कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी नव्या कोंबड्या आणण्याचे टाळले. परिणामी, सध्या महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – राज ठाकरे उद्या ठाण्यात; मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरातील दुसरा दौरा

महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, औरंगाबाद, सांगली आदी जिल्ह्यांमधून अड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्याचबरोबर तेलंगणा, हैदराबाद, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांतूनही महाराष्ट्रात अंड्यांचा पुरवठा करण्यात येतो. गतवर्षी कोंबड्यांच्या खाद्याच्या दरात ५० ते ६० टक्के वाढ झाली. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले. परिणामी, अंडी विक्रीचा घाऊक व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी कोंबड्यांची बदली प्रक्रिया पूर्ण केली नाही.

हेही वाचा – गोराई, दहिसर कांदळवन उद्यानाची कामे वेगात सुरू, दहिसर कांदळवन उद्यानातील अडचणी दूर

सध्या अंड्यांच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे बाजारात ६३० ते ७०० रुपये प्रति शेकडा दराने अंडी विकली जात आहेत. काही महिन्यांपूर्वी अंडी प्रतिशेकडा ५३० रुपये दराने मिळत होती, असे कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक काझीर मोमीन यांनी सांगितले. बाजारात ज्या किंमतीत अंड्यांची विक्री होते, त्यातून मूळ उत्पादन खर्चही भरून निघत नाही. कोंबड्यांच्या खाद्यात सोयाबिन, ज्वारी, मका, बाजरी, शेंगदाणे आदींचा समावेश करावा लागतो. जोपर्यंत पशुखाद्याच्या किंमती कमी होत नाहीत, तोपर्यंत अंड्यांच्या किंमतीत दरवाढ होतच राहील. सरकारने इतर व्यावसायांप्रमाणे कुक्कुटपालन व्यवसायालाही अनुदान द्यावे, अशी मागणी कुक्कुटपालन करणारे व्यावसायिक अब्दुल मजीद यांनी केली.

Story img Loader