मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील एका गगनचुंबी इमारतीला सोमवारी रात्री लागलेल्या आगीत एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील आणखी एक जण जखमी आहे.

अंधेरी (पश्चिम) येथील ओबेरॉय संकुलातील ‘स्काय पॅन इमारतीत सोमवारी रात्री १० च्या सुमार भीषण आग लागली. तेरा मजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर एका घरात ही आग लागली होती. आग विझवण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मध्यरात्री २ च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र या आगीत सदर घरातील राहुल मिश्रा (७५) यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर रौनक मिश्रा (३८) हा जखमी असून त्याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनाग्रस्त घरातील विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, घरातील सामान जळून खाक झाले.

Story img Loader